गुप्त....खाजगी ! ( बेवड्याची डायरी - भाग ६८ वा )
समूह उपचार संपल्यावर आम्ही तीन चार जण नेहमी प्रमाणे..सरांनी आज सांगितलेल्या विषयावर चर्चा करत बसलो होतो ..सुरवातीला जरी ' लैंगिक शिक्षण ' हा विषय व्यसनमुक्तीसाठी निरूपयोगी आहे असे आम्हा सर्वाना वाटले होते तरी नंतर जाणवले की..या बाबतीत शास्त्रीय माहितीपेक्षा ऐकीव माहितीच आमच्या कडे जास्त होती ..पूर्व प्रणय ..पश्चात प्रणय ..लैंगिक संबंधा बाबतची स्त्री पुरुषांची वेगवेगळी मानसिकता..हे सर्व मी प्रथमच ऐकत होतो ..गम्मत म्हणून एकाने शेरकर काकांना एकाने विचारले ' क्यो काका ..आप तो ये सब पहेले भी सून चुके हो ना ? आपकी पाचवी अडमिशन हे यहाॅपर .." काकांना त्यांच्या पाचव्या वेळी उपचारांना दाखल झाले आहेत हा उल्लेख आवडला नाही ..ते त्यांना टोमणा मारणाऱ्याला पटकन म्हणाले " अबे इतना उड मत ..पहेली अडमिशन है तेरी ..बहोत आसान लग रहा है ना तुझे सबकुछ ..नशामुक्ती इतनी आसान नही है ..अगली बार फिर आना पडेगा तेरेको ..अगर मेरी मजाक करेगा तो " काकांची हि शापवाणी ऐकून सगळे हसू लागले ..ज्याला काकांनी अगली बार फिर आना पडेगा असा शाप दिला होता..तो चिडला " अरे बुढढे ..जरा शुभ बोलना सिख ले तू ..तेरे आधे पैर कब्र में लटक रहे है फिर भी सेक्स कि बाते बडे चाव से सून रहा था " पुन्हा सगळे हसले ..आता सर्वच शेरकर काकांची मस्करी करू लागले ..एक म्हणाला " काका ये आपके माथे पर निशान कैसा है ? मैने सुना है के गाव मे किसी लडकी को छेडा था आपने तो उसने पत्थर मारा था फेंककर ? " दुसरा म्हणाला " नही यार ..ती वेगळी स्टोरी आहे ..काका आंबटशौकीन आहेत त्यामुळे झालेय हे..काका एकदा शेतावर जात असताना ..एका तुरीच्या काड्यांनी बनवलेल्या टेम्पररी बाथरूम मध्ये कोणीतरी अंघोळ करत होते ..काकांना वाटले कोणी बाई असेल .. काका गुपचूप वरून डोकावून पाहायला गेले .... अचानक काकांचा तोल गेला आणि काका त्या ताटीवरच पडले ..ताटी तुटून काकांसकट बाथरूममध्ये पडली ..थेट दगडावर डोके आपटले काकांचे ..मुख्य म्हणजे बाथरूम मध्ये कोणी बाई नव्हती तर काकांचाच एक शेतावरचा नोकर अंघोळ करत होता ..चक्क दांडेकर " सगळे खिदळू लागले ..काका शरमले हे सगळे काल्पनिक आहे असे ..स्पष्टीकरण देवू लागले आम्हाला ..
अशी थट्टा मस्करी चालली असताना ..एक माझ्याजवळ येवून म्हणाला " जरा आपसे प्रायव्हेट बात करनी है ..चलो जरा बाजू में " मी आणि तो दोघे जरा बाजूला जावून बसलो .." क्या आप मेरी तरफ से एक सवाल पुछोगे सर को ? " मी हकारार्थी मान डोलावली ..तो पुढे म्हणाला " मी मागच्या वेळी इथे अॅडमिट होतो ..एक महिना उपचार घेवून घरी गेल्यावर ..जेव्हा पत्नी जवळ गेलो तेव्हा मला अजिबात उत्तेजना आली नाही ..त्यामुळे मला खूप वाईट वाटले ..आता आपण कायमचे नपुंसक झालोत कि काय ? ..त्या टेन्शन मध्ये मी परत दारू प्यायलो ..मला सरना विचारायचे आहे की असे होते का ? त्यावर उपाय काय ? " ' अहो मग तुम्हीच सरांना विचार की हे ..लाजता कशाला ? " मी त्याला धीर देत म्हणालो ..मात्र तरीही तो तयार होईना ..शेवटी मी त्याला विचारीन सरांना असे म्हणून दिलासा दिला ..त्याचा प्रश्न स्वभाविक होता ..पण त्याने मोकळेपणी ही समस्या सरांजवळ बोलायला हवी होती असे मला वाटले ...इथे दाखल झाल्यावर पहिल्या आठवड्यात जेव्हा सरांनी मला भेटायला बोलावले होते तेव्हाच सांगितले होते ..येथे भरपूर प्रश्न विचारा ..मनात काहीही ठेवू नका ..कितीही खाजगी प्रश्न असला तरी येथील समुपदेशकांना विचारा ..कारण मोकळेपणी आपल्या समस्या मांडल्या तरच त्याची उत्तरे मिळतात ..येथील सर्व समुपदेशक तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्यास समर्थ आहेत ..जेथे त्यांना उत्तर माहित नसेल तेथे ते तुम्हाला मार्ग सांगतील नक्की " मला ते आठवले आणी मी त्याच्या वतीने सरांना प्रश्न विचारायचे ठरवले ..माॅनीटर ला मला सरांची भेट घ्यायची आहे असे सांगितले तर त्याने बाहेर ऑफिस मध्ये जाण्यास परवानगी दिली ..बाहेर जावून मी सरांना ..त्या मित्राने सांगितलेल्या समस्ये बद्दल विचारले ..याचे उत्तर तुम्हाला एकट्याला देण्यापेक्षा मी उद्या याच बाबत बोलतो ..असे सर म्हणाले.
दुसऱ्या दिवशी समूह उपचारांच्या वेळी सरांनी तो विषय काढलाच .." मित्रांनो परवा पासून आपण आपल्या जीवनाशी निगडीत असलेली अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा करतो आहोत ..ती चर्चा अजून एक दिवस चालेल ..मात्र माझी तुम्हाला विनंती आहे ..की या बाबत तुम्हाला असणाऱ्या समस्या ..प्रश्न तुम्ही मोकळेपणी विचाराल तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल ..दारू आणि अन्य मादक पदार्थांमुळे आपली लैंगिक क्षमता वाढल्याचा...स्खलन कालावधी वाढल्याचा..इंद्रिय उत्तेजना अधिक असल्याचा जरी सुरवातीला अनुभव आला असला तरी ..नंतर नंतर या व्यसनांमुळे आपल्या लैंगिक क्षमतेवर परिणाम होत जातो ..काही जणांना इंद्रिय उत्तेजानेची समस्या येते ..काहीना शिघ्रपतनाची..समस्या जाणवते ..तर काही जणांच्या शुक्राणूंची क्षमता कमी होऊन अपत्यप्राप्तीत अडथळे निर्माण होतात ..इथून बाहेर पडल्यावर तुम्हाला जर काही लैगिक समस्या आल्या तर ..अजिबात संकोच न करता भेटायला याल तेव्हा आम्हाला सांगा ..एक सर्वसामान्य समस्या म्हणजे शीघ्रपतनाची असते ..असा अनुभव आहे की येथून उपचार घेवून बाहेर पडल्यावर अनेकांना आपल्या जोडीदाराबरोबर लैंगिक संबंध करताना शीघ्रपतनाची समस्या जाणवते ..त्यांना आपले पौरुषत्व कमी झालेय असे वाटते .. लैंगिक संबंध पूर्ण होण्याआधीच त्यांचे स्खलन होते...त्यांना अशा वेळी खूप लज्जास्पद वाटते ..जोडीदाराची लैंगिक तृप्ती करण्यास पण असमर्थ झालोत अशी न्यून गंडाची भावना निर्माण होते ..व्यसन करत असताना हे होत नव्हते ..आता व्यसन केले नाही म्हणून होतेय की काय असे वाटून.. ते पुन्हा व्यसन करून लैंगिक संबंध प्रस्थापित करू पाहतात .. बंद असलेले व्यसन पुन्हा सुरु होते ..इथे घेतलेले उपचार शून्य होतात ..जर तुम्ही अशा प्रकारच्या समस्या आम्हाला सांगितल्या तर नक्कीच व्यसनमुक्ती टिकवता येणे सोपे होईल..कारण ही शीघ्र पतनाची किवा इंद्रिय उत्तेजनेची समस्या..तात्पुरती असते ..कोणताही न्यूनगंड न बाळगता हे आपल्या जोडीदाराला समजावून सांगा ..एखाद्या लैंगिक उपचार तज्ञाची( सेक्सॉलाॅजिस्ट ) मदत घ्या .. यावर औषधे व गोळ्या उपलब्ध आहेत . मात्र चुकुनही रस्त्यावर बसणाऱ्या वैदू कडून जडीबुटी खरेदी करू नका ..अथवा ऐकीव गोष्टी करू नका ..हे वैदू अथवा वर्तमान पत्रात जाहिरात देवून लैंगिक समस्यावर औषधे देणाऱ्या खोट्या ..फसव्या पदव्या धारण करणाऱ्या लोकांची मदत घेवू नका .त्यामुळे तुमचे अधिक नुकसान होईल .
( बाकी पुढील भागात )
No comments:
Post a Comment