Monday, September 15, 2014

विकली ऑफ ????

विकली ऑफ ????  ( बेवड्याची डायरी - भाग ६७ वा ) 

स्त्री ला दुय्यम स्थान दिले गेल्या मुळेच स्त्री वरील अन्याय व अत्याचाराचे प्रमाण वाढते आहे ..तिच्यावर अनेक बंधने लादली गेली आहेत ..स्त्री वर होणार्या कौटुंबिक अन्यायाचे प्रमाण तर खूप मोठ्या प्रमाणात आहे ...बहुतेक वेळा स्त्री सहनशिलते मुळे चूप बसते..घराची अब्रू चव्हाट्यावर यायला नको याची काळजी घेते ..म्हणूनही हे प्रमाण वाढते आहे ..सध्या कायद्याने जरी स्त्रीला जरी खूप झुकते माप दिले असले तरी .. स्त्रिया बहुधा कायद्याची मदत घेणे टाळतात ..कारण त्यांना कुटुंबाची ..पतीची समाजात बदनामी झालेली मनापासून आवडत नाही..गम्मत म्हणून सांगतो अनेकांना कदाचित हा कायदा माहित नसेल ..एक कायदा स्त्री च्या बाजूने असा आहे की स्त्री ला आठवड्यातून एकदा हक्काची सुटी द्यायला हवी ..म्हणजे आठवड्यातून एक दिवस ..स्वैपाकपाणी .धुणीभांडी..घरातील इतर जवाबदा-या यातून स्त्रीला हक्काची सुटी मिळाली पाहिजे असे कायद्याने सांगितले आहे ..कारण नोकरी करणाऱ्या पुरुषांना आठवड्यातून एकदा सुटी मिळते ..त्या दिवशी ते आज सुटी आहे ..मी मनसोक्त जगणार असे हक्काने सांगतात ..शनिवारी रात्रीपासूनच ते सुटी उपभोगायला सुरवात करतात ..मग रविवारी उशिरा उठणे ..आळसात दिवस घालवणे ..अशा गोष्टी ते करतात ..मात्र स्त्री ला सकाळी उठून सगळ्यांसाठी चहा करणे ..केर काढणे ..घरातील आवरासावर करणे ..स्वैपाक करणे ..पाने वाढणे ..पाने काढणे .या गोष्टींपासून कधीच सुटी नसते ..म्हणून अशी सुटी कायद्याने मंजूर केली आहे ..मात्र किती पुरुषांना आठवड्यातून एकदा का होईना स्वताचा चहा स्वतः करून घेणे ...घरातील केर काढणे ..स्वैपाक करणे ..घराची आवरासावर करणे हे रुचेल? " ..कोणीच हात वर केला नाही ..ते पाहून सर म्हणाले .." पहा एकही हात वर झाला नाही ..म्हणजेच विशिष्ट कामे स्त्रियांनीच करायला हवीत ..हा समज आपल्या मनात पक्का बसलाय ..अगदी तसेच स्त्री च्या बाबतीत झालेय ..वर उल्लेखलेली कामे स्त्रियांनीच करायची असतात असे त्यांच्या मनावर लहानपणापासून ठसवले गेले आहे ..त्यामुळे कायद्याने आठवड्यातून एक दिवस कौटुंबिक जवब्दार्यातून हक्काची सुटी घेण्याची मुभा असली तरी स्त्रिया ही सवलत घेत नाहीत हे आपले नशीबच म्हणायचे ..जर एखाद्या स्त्री ने अशी हट्टाला पेटून आठवड्यातून एकदा कौटुंबिक जवब्दार्यातून सुट्टी मागितली आणि अशी सुटी मिळाली नाही म्हणून पोलीसात तक्रार करेल तर सगळा समाज त्या स्त्री च्या विरोधात जाईल ..बाईच्या जातीने असे करायला नको म्हणेल ..सासरचेच काय तिच्या माहेरचे देखील तिच्यावर नाराज होतील ".

" सर मैने ऐसा सुना है के जो स्त्री रजस्वला होती है ..उसने भगवान की पूजा नही करनी चाहिये ..और उसके छुनेसे घरका आचार खराब होता है... ये बात सही है क्या ? छान प्रश्न आहे तुमचा ..आपण शास्त्रीय दृष्टीकोनातून या गोष्टीकडे पहिले पाहिजे ..एकविसाव्या शतकात प्रवेश करूनही आपण अजूनही अनेक प्रकारच्या धार्मिक अंधश्रद्धा पाळतो ..खरे तर रजोस्त्राव ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ..स्त्री वयात आल्यावर ..म्हणजे तिच्या शरीरात बीजांड अथवा स्त्रीबिजाची निर्मिती सुरु झाल्यावर ..ती स्त्री गर्भवती होण्याची क्षमता तिच्यात निर्माण होते ..ही प्रक्रिया जरी सर्व साधारणपणे वयाच्या १२ ते १६ व्या वर्षापर्यंत सुरु होत असली तरी देखील तिचे गर्भाशय परिपक्व होऊन गर्भाचे योग्य पोषण होण्यास वयाची अठरा वर्षे पूर्ण व्हावी लागतात ..मात्र एकदा बीजांडाची निर्मिती सुरु झाली की स्त्री बीजाचा शुक्राणूशी संबंध येवून गर्भधारणा होऊ शकते ..अशा वेळी गर्भधारणा झाल्यास गर्भाची सुरक्षित वाढ व्हावी ..त्याला गर्भाशयात योग्य संरक्षण मिळावे म्हणून ..गर्भाशयात एक पातळसर त्वचेचे अस्तर तयार होते ..जर बीजांड फलन होऊन गर्भधारणा झाली नाही तर ते अस्तर आपोआप सुटून गर्भाशयातून विलग होते व ते तुकड्यांच्या स्वरुपात योनीमार्गातून रक्तासह बाहेर पडते ..याला रजोस्त्राव म्हणतात .. ही प्रक्रिया सुमारे तीन ते चार दिवस चालते ..त्या काळात हा रक्तस्त्राव सतत योनीमार्गातून होत असतो ..पूर्वीच्या काळी हल्ली असलेले सेफ्टी पॅड अस्तित्वात नव्हते ..या कालावधीत स्त्रीच्या ओटीपोटात सतत वेदना होऊ शकतात..तसेच सतत स्त्रवणाऱ्या स्त्रावामुळे स्त्री ला अवघडले पण वाटत असते ..त्या काळी अशा स्त्री ने कौटुंबिक जवाबदा-यातून सुटी घेवून आराम करावा म्हणून ..या काळात तिने कोणतीही कामे करू नयेत ..वेगळे बसावे ..कोणाला स्पर्श करू नये असे सांगितले जाई ..थोडक्यात अशा स्त्री ला विश्रांती घेता यावी असा हेतू या मागे होता ..त्यासाठी देवपूजा करू नये ..पाण्याला शिवू नये ..वगैरे बंधने घालण्यात आली ..नंतर याबाबत अनेक अंधश्रद्धा जोडल्या जावून ..लोणचे खराब होणे वगैरे अंधश्रद्धा पुढे आल्या ..हल्लीच्या वेगवान काळात स्त्री देखील पुरुषांच्या जोडीने सर्व क्षेत्रात यशस्वीपणे वावरते आहे..दर महिन्यात निर्माण होणाऱ्या रजोस्त्रावात अवघडलेपण वाटू नये म्हणून आरामदायी सेफ्टीपॅडस बाजारत उपलब्ध आहेत ..पूर्वी असा स्त्राव सुसह्य होण्यासाठी सेफ्टीपॅडस नव्हते ..एखादा कपडा योनिमार्गाजवळ लावून काम भागवले जाई ..तरीही हा प्रकार अतिशय अवघडलेपणाचा असतो हे नक्की ..तुम्ही कल्पना करा की तुम्हाला जर सतत असा स्त्राव सतत होऊन तीन चार दिवस डायपर लावून वावरावे लागले तर कसे वाटेल ? ' सरांच्या या प्रश्नाने आम्ही विचारात पडलो ..एकंदरीत कठीणच होते ते .

( बाकी पुढील भागात )

Sunday, September 14, 2014

बंदिनी .. ? ? ?

बंदिनी .. ? ? ?  ( बेवड्याची डायरी - भाग ६६ वा ) 

लहानपणापासून पुरुषांच्या मनावर... तू स्पेशल आहेस असे असे संस्कार करण्यास पालक जवाबदार असतात ..घरातील मुलीच्या .. मनावर आपण अबला आहोत ..दुय्यम आहोत ..पुरुषी आधाराची आपल्याला गरज आहे ..पुरुष अधिक कर्तुत्ववान असतात ..अधिक शक्तिमान असतात ..असे कळत नकळत बिंबवले जाते ...जणू असे त्यांच्या मनावर बिंबवून त्यांना पुढे त्यांच्यावर होऊ शकणाऱ्या संभाव्य अन्यायाला सहन करण्यास त्यांनी तयार करावे असाच हेतू असतो .. अगदी खाण्यापिण्याच्या वस्तूपासून ते ...कपडेलत्ते ..खेळ..घरातील कामे ..या सर्व बाबतीत मुलींच्या वेगळेपण वाट्याला येते ..त्यांतूनच स्त्रिया अधिक अधिक सहनशील होत जातात ..काही सामाजिक प्रथा देखील हे वेगळेपण अधिक ठळक करतात ..ज्यात मुलीच्या लग्नासाठी वर संशोधन ..हुंडा ..मानपान ..सासरच्या मंडळींचा लग्नकार्यातील वरचष्मा ..जावयाचे रुसणे ..या सर्व बाबीतून त्या मुलीवर आणि तिच्या पालकांवर जणू उपकारच केले जात आहेत असे भाव असतात खरे तर घरात सकाळी सगळ्यात आधी कोण उठते आणि सगळ्यात शेवटी कोण झोपते याचा विचार केल्यास ..घरातील स्त्री सगळ्यात आधी उठते आणि रात्री सर्वात उशिरा तीच झोपते .हे उत्तर मिळेल ...म्हणजे घरात अगदी सकाळी लवकर उठून घरच्या सदस्यांसाठी चहा करण्यापासून तिची जवाबदारी सुरु होते .. रात्री सगळ्यात शेवटी ..झाकपाक करणे.. दारे खिडक्या लावणे ..दिवे बंद करणे ..सटरफटर वस्तू जागेवर ठेवणे ..अशी सर्व कामे स्त्री कडेच सोपवली जातात ..ज्या घरात स्त्री देखील पुरुषांच्या जोडीने अर्थार्जनासाठी नोकरी करते तेथे देखील अगदी थोड्याफार फरकाने हेच दिसते ..कामाचा झपाटा ..उरक ..नीटनेटकेपणा ..टापटीप ..या बाबतीतही.. स्त्री अग्रेसर असते ..घरातील पुरुषांच्या कामाच्या ..शाळा कॉलेजच्या वेळा सांभाळून त्यांना तयारीसाठी मदत करणे ..अशी शेकडो कामे स्त्रिया विनातक्रार करत असतात .त्यांना लहानपणापासूनच या साठी तयार केले जाते .. तरीही योग्य मान सन्मानाच्या बाबतीत त्यांना डावलले जाते ..त्यांच्या मताला बहुधा दुय्यम स्थान असते ..वर स्त्री च्या नशिबाला हे भोग असतातच असे सांगितले जाते ..स्त्री ला जरी ' देवी ' चे अथवा ' शक्ती ' चे स्थान दिले गेले असले तरी व्यवहारात मात्र तिची ' शक्ती ' अथवा ' दैवी ' पण क्षीण करण्यास पुरुषच जवाबदार असतो ..आपण पुरुषांनी या बाबत गंभीरपणे विचार करून स्त्री बद्दल योग्य आदर बाळगणे शिकले पाहिजे . तसेच आसपासच्या पुरुषांना विचार करण्यास भाग पाडले पाहिजे ..म्हणजे आपोआप स्त्री वर होणारे कौटुंबिक व सामाजिक अन्याय.. अत्याचार कमी होतील..

स्त्री कडे केवळ एक उपभोग्य वस्तू ..अथवा ' यंत्र ' या भावनेतून न पाहता जर एक संवेदनशील मानव म्हणून आपण पहिले तरच तिच्या त्यागाची ..कष्टाची ..समर्पणाची नीट कल्पना येवू शकते. स्त्री वरील मालकी हक्काच्या भावनेतूनच ' योनिशुचिता ' हा प्रकार जन्माला आलाय ..त्याचा संबंध थेट स्त्री च्या चारित्र्याशी आणि पुरुषाच्या इभ्रतीशी जोडला जातो ...स्त्री च्या गर्भाशयाकडे जाणाऱ्या योनीमार्गाच्या तोंडाशी एक पातळसा पडदा असतो ( हायमेन ) ज्याच्या संबंध स्त्रीच्या " शीलभंगा " शी जोडला गेलाय ..प्रथम संभोगाच्या वेळी... अथवा एखाद्या हलक्याश्या धक्क्याने ..अथवा छोट्याश्या अपघाताने देखील हा पातळ पडदा फाटू शकतो ज्यावरून ..त्या स्त्री च्या चारित्र्याची परीक्षा केली जाण्याचा प्रघात अजूनही काही ठिकाणी आढळत जाते ...खरे तर ' चारित्र्य ' ही संज्ञा केवळ योनीमार्गातील पातळ पडद्याच्या भंग होण्याशी जोडणे निव्वळ मूर्खपणा आहे ..एखाद्या स्त्री चे संसारातील समर्पण ..कुटुंबासाठी केलेला त्याग ..तिने उपसलेले कष्ट ..तिचे एकंदरीत वर्तन..कर्तुत्व ..या गोष्टीना जास्त महत्व असले पाहिजे .. संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे ' स्त्रियश्चारीत्रम ..पुरुषस्य भाग्यं .." असा ..ज्याचा अर्थ असा आहे की स्त्री चे चारित्र्य आणि पुरुषाचे भाग्य हे देव देखील समजू शकत नाहीत ..तर मानवाला कसे कळणार ? ..या श्लोकात चरित्र हा शब्द केवळ ' शील ' या अर्थाने घेतला जातो .. ..खरे तर या श्लोकाद्वारे कदाचित हेच सूचित केले गेलेय की स्त्री ला लहानपणापासून अनेक विकारी पुरुषांना तोंड द्यावे लागत असल्याने ..मामा ..काका ..वडील ..भाऊ..चुलत ..आते ..वगैरे नात्यात अथवा आसपास वावरणाऱ्या पुरुषांपासून ..स्त्री शरीराला अनेक धोके असतात ..तिच्या असहायतेचा..सहनशीलतेचा ..भाबडेपणाचा ..माफ करण्याच्या वृत्तीचा कोण कसा फायदा घेईल हे सांगणे कठीण आहे ..त्यामुळे तिच्या शिलाची नेमकी खात्री देता येणे कठीण आहे ..त्याबाबत जास्त बाऊ करू नये ..ते सगळे सहन करून .. सगळे पचवून ..केवळ मनात ठेवून स्त्री वावरत असते ..जर तिने वाच्यता केली तरी दोष तिच्याकडेच जातो ..समाज तिच्याकडेच वाईट नजरेने पहातो...म्हणून ती कोणाला काही न सांगता मनात ठेवते ..आणि तिचे चरित्र कोणाला समजू शकत नाही ..वेगळ्या दृष्टीकोनातून पहिले तर हा श्लोक उलटा असला पाहिजे.. पुरुषस्य चरित्रं .. " असा . कारण पुरुष लैंगिकतेच्या बाबतीत अधिक आक्रमक ..किवा शारीरिक संबंधाना अधिक प्राधान्य देणारा असतो .

( बाकी पुढील भागात )

वंशाचा दिवा ..कुलदीपक ..वगैरे !

वंशाचा दिवा ..कुलदीपक ..वगैरे ! ( बेवड्याची डायरी - भाग ६५ वा ) 

कामतृप्तीच्या क्षणाबाबत सर माहिती सांगत असताना एकाने प्रश्न विचारला " सर काम वासना जादा मात्रा में स्त्री में होती है या पुरुष मे ? जरा विचित्रच प्रश्न होता त्याचा ...सर काय उत्तर देतात याबाबत मला कुतूहल होते ..' लैंगिक प्रेरणा ही नैसर्गिक असते ..तसेच स्त्री व पुरुष या दोहोंमध्ये ही प्रेरणा उपजत आढळते ..लैंगिकता हे आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे ..हे मी पूर्वीच सांगितले आहे ...स्त्री- पुरुष दोघांना शरीर संबंधांची गरज असते ..तसेच ' कामतृप्ती ' चा तो अदभूत क्षण अनुभवणे दोघांनाही आवडते ..हवे असते ..या समान बाबी आहेत ..कामवासना किवा शरीर संबंधांची वासना जास्त कोणात असते हा प्रश्नच उद्भवत नाही ..तरीही या बाबत पुरुष जास्त अधीर ..उतावळा .असतो असे सांगता येईल ..निसर्गतः विचार केला तर ..खूप पूर्वी जेव्हा संतती नियमनाची साधने उपलब्ध नव्हती ..लोकसंख्या वाढीची समस्या नव्हती ..तेव्हा पासून विचार केला तर ..शरीर संबंधांची शारीरिक गरज असूनही ..स्त्री या बाबत अधिक सावध असणे स्वाभाविक असे ..कारण शरीर संबंधानंतर जेव्हा गर्भ धारणा होई तेव्हा स्त्री ची जवाबदारी वाढत असे ..तिला गर्भ सांभाळणे ..योग्य ती काळजी घेणे ..प्रसुतीवेदना सहन करणे ..झालेल्या अपत्याचे संगोपन करणे ही सगळी पुढील कामे करावी लागत असत ..पुरुषाला केवळ झालेल्या अपत्यांचे पालनपोषण करण्यासाठी हातभार लावण्याचे काम होते .. त्या काळी एकेका जोडप्याला आठ ते दहा ..आणि त्यापेक्षाही जास्त अपत्ये असत ..अगदी वर्षाला एक अपत्य असाही प्रकार घडत असे ..त्यावेळी कल्पना करा की इतकी मुले सांभाळणे ..मुले मोठ होईपर्यंत सर्वांची समान काळजी घेणे ही मोठीच जवाबदारी स्त्री वर असे ..त्याकाळी स्त्रियांना शारीरिक आणि मानसिक त्रास किती भोगावे लागत असतील ?

त्यामुळे त्या काळी स्वभाविकपणे अनेक स्त्रियांना वारंवार शरीर संबंध म्हणजे एकप्रकारची शिक्षाच वाटल्यास नवल नाही ..हल्लीची काळात संतती नियमनाची साधने उपलब्ध असल्याने ..लोकसंख्या नियंत्रणा बाबत जागृती वाढल्याने ही समस्या उरलेली नाहीय ..तरीही मानसिक दृष्ट्या विचार केलातर शरीर संबंधांची ओढ स्त्री च्या तुलनेत पुरुषांच्या मनात अधिक असते ..तसेच प्रेम किवा प्रणयाच्या दोघांच्या कल्पना थोड्या भिन्न आढळतात ..आपल्या आवडत्या व्यक्तीने जास्तीत जास्त वेळ आपल्या सहवासात रहावे ...त्याच्याशी गप्पा माराव्यात ..हितगुज करावे ..आपली स्तुती करावी ..आपल्या कामाचे कौतुक करावे ..या सर्व गोष्टीं स्त्री ला मनापासून आवडतात ..आणि या सर्व गोष्टींचा परीपाक म्हणून ..अगदी शेवटी लैंगिक उत्तेजना आल्यावर...सहज शक्य झाल्यास ..पुरेसा एकांत लाभल्यास ..शरीर संबंध व्हावेत असे स्त्री ला वाटते ..जास्तीत जास्त वेळ आपल्या आवडत्या स्त्री चा अथवा जोडीदाराचाचा सहवास ..तिच्याशी हितगुज ..गप्पागोष्टी..यात वेळ घालवणे बहुधा पुरुषांना भावत नाही ..आपले काम लवकरात लवकर कसे साध्य करता येईल या कडे त्याचे अधिक लक्ष असते ..किवा त्याचे सर्व बोलणे ..हालचाली केवळ शरीर संबंधांच्या दिशेने असतात ..अनेकदा स्त्री ला शरीर संबंध नको असतात ..तरी केवळ आपल्या आवडत्या पुरुषाने आपल्यापासून दूर जावू नये म्हणून स्त्री त्याला शरीर समर्पित करते ..म्हणजे कामवासनेचे नियंत्रण पुरुषांपेक्षा स्त्री कडे जास्त असते असे म्हणता येईल ...म्हणूनच निसर्गाने पुरुषाच्या शरीर संबंध करण्याच्या क्षमतेवर काही मर्यादा घातल्या आहेत ..पहिली मर्यादा म्हणजे लिंगाला उत्तेजना आल्याशिवाय शरीर संबंध करणे पुरुषाला अशक्यप्राय असते ..दुसरी मर्यादा म्हणजे ...एकदा शरीर संबंध होऊन स्खलन झाल्यावर पुन्हा लिंग उत्तेजने साठी लागणारा वेळ ....तिसरी मर्यादा म्हणजे एका दिवसात एका पुरुषाला जास्तीत जास्त म्हंटले तर तीन ते चार वेळाच लिंग उत्तेजित होऊन शरीर संबंध करता येणे ..अर्थात तरीही अनेक पुरुष शरीर संबंधाबद्दल एकमेकांकडे बढाया मारताना आढळतात .. विनोद असा की काही जण तर एका दिवसात आठ ते दहा वेळा शरीरसंबंध केला असे सांगून उगाचच आपला पुरुषार्थ वाढवून सांगतात ..जर निसर्गाने या मर्यादा पुरुषावर घातल्या नसत्या तर पुरुष कामधंद्यासाठी देखील घराबाहेर पडला नसता ..सरांनी हे सांगून स्पष्ट केले होते की ,,कामवासनेच्या बाबतीत पुरुष जास्त पुढाकार घेणारा असतो ..तुलनेत स्त्री अधिक संयमी असते ..

जरी निसर्गाने स्त्री व पुरुष यांचे एकमेकांच्या जीवनात समान स्थान निर्माण केलेले असले तरी पुरुषाने केवळ पुरुषी अहंकारामुळे स्त्री ला कमी लेखणे सुरु केले ..तिच्यावर अनेक निर्बंध लादले.. ते केवळ स्त्री ने आपल्या अधिपत्याखाली रहावे या भावनेने ..हे निर्बंध लादण्यामागे असुरक्षितता आणि अनेक प्रकारचे न्यूनगंड ..कारणीभूत आहेत ..स्त्रीकडे केवळ देह्भोगाचे एक साधन म्हणून पहिले गेल्याने समाजात अजूनही स्त्री अत्याचाराच्या घटना वाढत आहेत..खरेतर चिकाटी ..सहनशीलता ..मनाचे नियंत्रण.. या बाबतीत स्त्रिया निसर्गतः पुरुषांपेक्षा पुढे आहेत ...तरीही जास्तीत जास्त लोकांना आपल्याला मुलगा व्हावा असे वाटते ..आणि कन्या नको असते..त्यासाठी वंशाला दिवा ..कुलदीपक अशी अनेक धार्मिक परंतु अशास्त्रीय करणे पुढे केली जातात ..खरेतर व्यसनाच्या आहारी जाण्यात ..गुन्हेगारी करण्यात ..अन्याय ..भ्रष्टाचार....हिंसा करण्यात जास्तीत जास्त पुरुषवर्ग आढळतो ..इथे व्यसनमुक्ती केंद्रात सगळे कुलदीपक .वंशाचे दिवे आलेले आहेत ..कारण लहानपणापासून पुरुषांना वेगळ्याप्रकारे वाढवले जाते ..स्पेशल लाड होतात ..कमी निर्बंध लादले जातात .

( बाकी पुढील भागात )

कामतृप्तीचा कालावधी ? ? ? ?

कामतृप्तीचा कालावधी ? ? ? ?  ( बेवड्याची डायरी - भाग ६४ वा )

आपल्या जोडीदाराच्या भावनांची काळजी घेणे हे मानवी शरीर संबंधात अतिशय महत्वाचे आहे ..अनेक जोडप्यांना लग्नानंतर काही वर्षांनी एकटेपणा जाणवणे ..कोणातरी एकाला शरीर संबंधांचा उबग येणे ..अथवा या व्यक्तीशी लग्न करून आपण फसलो..अशी भावना मनात एकमेकांच्या निर्माण होण्याचे हेच कारण असावे ..किवा दुसऱ्या व्यक्तीकडे आपला जोडीदार आकर्षित होण्यास देखील हा ..भावनिक दुरावा कारण बनू शकतो होऊ शकते ..लग्नानंतरच्या सुरवातीच्या काळात एकमेकांवर खूप प्रेम असणारी अनेक जोडपी ...लग्नानंतर सुमारे १५ वर्षांनी ..एकमेकांबद्दल नाखूष असतात...आपल्या जोडीदाराचे आपल्यावर पूर्वीसारखे प्रेम राहिले नाही असे त्यांना वाटत राहते ...केवळ आपल्या जोडीदाराला आपण भरपूर शरीरसुख देतो अथवा त्याला पैसे ..दागिने ...नोकर चाकर ..उपलब्ध करून दिले की जोडीदार एकनिष्ठ राहील ..हा एकमेव निकष येथे लावता कामा नये ..कामतृप्ती हा सुखी संसाराचा एक पैलू असू शकतो ..मात्र त्यावरच संसार टिकून राहील..सुखी होईल याची खात्री बाळगणे चूक ठरू शकते ..प्रत्यक्ष शरीर संबंधांच्या वेळी स्त्री - पुरुषांचा " कामतृप्ती " गाठण्याचा क्षण वेगवेगळा असू शकतो ..याचे कारण पुरुष लवकर उत्तेजित होत असल्याने तसेच उतावळा असल्याने ..त्याला हा क्षण गाठणे सोपे असते ..तर स्त्री ला उत्तेजित होण्यास पुरुषाच्या तुलनेत जास्त वेळ लागतो ..म्हणून पूर्व प्रणय आवश्यक असतो ..जेणे करून आपल्या जोडीदाराला शरीर संबंधांसाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या तयार करता येते ..सर पुढे माहिती देत असताना एकाने हात वर करून प्रश्न विचारला " सर ..शरीर संबंधात " कामतृप्ती " चा क्षण गाठण्यास किती वेळ लागतो ? "..

" तसे पहिले तर नैसर्गिक व शास्त्रीय दृष्ट्या योग्य उत्तेजित आल्यावर ..प्रत्यक्ष शरीर संबंध सुरु झाल्यावर ..म्हणजेच लिंगाने योनिप्रवेश केल्यावर ..सर्वसाधारण अवस्थेत तीन ते चार मिनिटात " कामतृप्ती ' चा क्षण दोघानाही गाठता येतो ..अर्थात येथे नैसर्गिक व शास्त्रीय दृष्ट्या योग्य उत्तेजित झाल्यावर..हा शब्द अतिशय महत्वाचा आहे ..उत्तेजनेच्या बाबतीत लिंगाला पुरेशी ताठरता येणे हा निकष येथे पुरुषांच्या बाबतीत आहे तर ..उत्तेजित झाल्यावर लिंगाला सहजगत्या योनी प्रवेश करू देण्यास योनीस्त्राव पाझरणे हा निकष " स्त्री " च्या बाबतीत बाबतीत लागू पडतो ..गम्मत अशी की अनेकदा पुरुष स्वताच्या उत्तेजनेची काळजी घेतो नीट ..कारण लिंगाला ताठरता आल्याशिवाय लिंगाचा योनी प्रवेश होणे अशक्यप्राय असते ..मात्र स्त्री च्या बाबतीत योनीस्त्राव सुरु झाला आहे अथवा नाही याची तो खात्री करून न घेता ..शरीर संबंध सुरु करतो अशा वेळी त्याला योनीप्रवेश करण्यास अवघड जाते ..जास्त बळाचा वापर करावा लागतो ...जोडीदार स्त्री ला त्यामुळे वेदना होऊ शकतात ..अशा शरीर संबंधात पुरुषाच्या ' कामतृप्ती ' चा क्षण त्याल गाठता येतो ..मात्र जोडीदार स्त्री हा क्षण गाठू शकत नाही ..किवा शरीर संबंधांची पुरुषाने घाई केल्यास ..स्त्री नेमकी उत्तेजित होत असतानाच पुरुषाचे स्खलन होऊन तो ..जोडीदार स्त्री ला त्या क्षणापासून वंचित ठेवतो ..अतृप्त ठेवतो ..येथे लिंगाचा आकार ..लांबी ..रुंदी या बाबी गौण असतात ..अनेक लोकांच्या मनात ब्लू फिल्मस पाहून ..अथवा अशास्त्रीय पुस्तके वाचून.. लिंगाच्या आकाराच्या बाबतीत किवा शरीर संबंधांना लागणाऱ्या वेळेच्या बाबतीत गैरसमज अथवा न्यूनगंड तयार होतात ..आपल्या लिंगाच्या आकाराची तुलना ब्लू फिल्म मध्ये काम करणाऱ्या पुरुषाच्या लिंगाच्या आकाराशी करणे अथवा शरीर संबंधाचा वेळ वाढवण्यासाठी दारू किवा अन्य मादक द्रव्यांचा वापर करणे अयोग्य आहे .. योग्य पद्धतीने उत्तेजित झाल्यावरच ...दोघांनाही कामतृप्तीचा तो चरम क्षण गाठणे सहज शक्य होते ..

दारू अथवा अन्य मादक द्रव्यांचे सेवन करून .. जास्तवेळ शरीर सुखाचा आनंद मिळतो हा मोठा गैर समज आहे ..दारूच्या बाबतीत इंग्रजीत एक वाक्य असे म्हंटले आहे आहे की " अल्कोहोल इंक्रीजेस डिझायर ..बट डीक्रीजेस परफाॅरमन्स " म्हणजे इच्छा वाढते मात्र कृतीत व्यक्ती कमी पडते ..अर्थात हे वाक्य अगदी थोडी अथवा क्वचित दारू पिणाऱ्या व्यक्ती लागू पडत नाही ..मात्र दारूच्या आहारी गेलेल्या व्यसनीना तंतोतंत लागू पडते .. व्यसनी झाल्यावर लिंगाची पुरेशी उत्तेजना अथवा लिंगाला ताठरता येणे बंद होते ..किवा तात्पुरती अथवा कायमची नपुंसकता येते ..तसेच त्याचे स्खलन अगदी काही क्षणातच होऊ लागते ..' शीघ्रपतनाची ' समस्या निर्माण होते . ..अफूजन्य मादक पदार्थांच्या बाबतीत ....म्हणजे ब्राऊन शुगर ..हेरोईन ...किवा माॅर्फिन..अथवा कोकापासून बनेलेले कोकेन या मादक द्रव्यांचे सेवन केल्यावर वेगळा अनुभव असतो ..या द्रव्यांच्या सेवनाच्या सुरवातीच्या काळात जरी उत्तेजना खूप वेळ म्हणजे अगदी अर्धा तास किवा एक तास टिकत असली.. तरी नंतर नंतर अक्षरशः लिंगाला उत्तेजना येणे बंद होते ..अथवा तात्पुरती किवां कायमची नपुंसकता पुरुषाच्या पदरी येवू शकते ..

( बाकी पुढील भागात )

पूर्व प्रणय ...? ? ?

पूर्व प्रणय ...? ? ?  ( बेवड्याची डायरी - भाग ६३ वा ) 

' कामतृप्ती ' ही संकल्पना सर सांगत असताना ..आम्ही सगळे गंभीर झालो होतो ..आपल्या जोडीदाराच्या भावनांची पर्वा न करता केलेला शरीर संबंध हा ' बलात्कारच ' ठरतो हे सरांनी सांगितल्यावर ..मला अनेक प्रसंग आठवले जेथे ..दारू पिवून मी पत्नीशी प्रणय केला होता ..अगदी ' हनिमून ' च्या दिवशी देखील ..मित्रांच्या आग्रहावरून मी गुपचूप बियर प्यायलो होतो .. जवळ जाताच पत्नीने " कसलातरी आंबूस वास येतोय " हे मला बोलून दाखवले होते ..मी तिला तुझे काहीतरीच असते असे म्हणून उडवून लावले होते .. नंतर सराईत पिणारा झाल्यावर तर प्यायल्याशिवाय आपल्याला शरीरसंबंध करताच येणार नाही.. अशी भावना मनात पक्की रुजली होती ..त्यामुळे पत्नीच्या नाक मुरडण्या कडे निर्लज्ज पणे दुर्लक्ष करून मी स्वताचा स्वार्थ साधत गेलो...तिने विरोध केल्यावर देखील मी अनेकदा माझा नवरेपणाचा हक्क बजावला होता ..इतकेच नव्हे तर .." हल्ली तुझी हवी तशी साथ मिळत नाही " असा टोमणाही मारला होता ..आता सगळे आठवून प्रचंड शरम वाटत होती स्वता:ची ..वाटले जर पत्नीने नवऱ्याविरुद्ध बलात्काराची केस टाकायची ठरवले तर ??? ..पुरुषांच्या सुदैवाने स्त्रिया असे करत नाहीत ..संसारातले त्यांचे समर्पण त्यांना बांधून ठेवते ..शिवाय ' पती परमेश्वर ' हा संस्कार त्यांच्या मनावर लहानपणापासून बिंबवला गेल्याने ...त्या वारंवार माफ करतात पतीला..एक व्यक्ती म्हणून देखील मी अनेकदा पत्नीचा अपमान केला होता ..तिच्या कार्यक्षमतेवरून ..तिच्या नातलगांवरून ...टोमणे मारले होते...बावळट..मूर्ख ..बेअक्कल ..ही विशेषणे तरी नेहमीची होती .. बिचारीकडे एकमात्र शस्त्र उरले होते...रडण्याचे ..अबोला धरण्याचे .. एखादा दिवस स्वैपाक न करण्याचे ..जास्तीत जास्त काय तर रागावून एकदोन दिवस माहेरी जाण्याचे ...आता या पुढे पत्नीच्या भावनांची काळजी घ्यायची असे मी मनात ठरवले ..

सर पुढे सांगू लागले ..प्रत्यक्ष प्रणय करण्यापूर्वी आपल्या जोडीदाराशी पेमळ संवाद करणे ..गोड बोलणे..त्याची स्तुती करणे ..त्याच्या चिंता ..काळज्या जाणून घेणे ..विशिष्ट ठिकाणी स्पर्श करून जोडीदाराला उत्तेजित करणे .. या सगळ्या गोष्टी ' पूर्व प्रणय ' ( फोरप्ले ) या सदरात मोडतात ..तर स्खलन झाल्यावर ..जोडीदाराचे .थोपटून ..कुरवाळून ..आभार व्यक्त करणे ..आपण एकमेकांचे सुख दुखा:चे साथीदार आहोत याची जाणीव करून देणे..त्याच्या विवंचना समजून घेणे ..काही काळ मृदू संवाद करणे हे सगळे ( आफ्टर प्ले ) या प्रकारात येते .. ज्यामुळे भावनिक बंध दृढ राहण्यास मदत होते ..बहुतेक पुरुष पूर्वप्रणया बाबत जागरूक असतात ..परंतु पश्चात प्रणयाबाबत बेफिकीर असतात ..आपला कार्यभाग उरकला की ते जोडीदाराकडे पाठ फिरवतात ..जरी स्त्रिया बोलून दाखवत नसल्या तरी ' कामापुरते गोड बोलून आपला वापर केला गेलाय " ही भावना त्यांच्या मनात येवू शकते ..मोठ्या शहरातून जागेच्या कमतरतेमुळे ..पुरेसा एकांत नसल्याने हे सर्व साग्रसंगीत शक्य होत नाही ..बहुतेक वेळा शरीरसंबंध ही एक तडजोड बनते ..तरीही शक्य होईल तेव्हा या गोष्टींचे भान ठेवणे गरजेचे असते ..

" किती लोक महिन्यातून एकदा का होईना आपल्या पत्नीसाठी आठवणीने गजरा आणतात ? " सरांनी अचानक सर्वाना प्रश्न विचारला..आम्ही सगळे एकमेकांकडे पाहत होतो ..फक्त एक दोन हात वर झाले ..हात वर केलेल्या एकाला सरांनी विचारले " गजरा आणला तेव्हा दारू पिवून होता का तुम्ही ? " त्याने होकारार्थी मान हलवली ..सगळे मोठ्याने हसले ..सर स्मित करून म्हणाले ..म्हणजे तुम्ही आणलेला गजरा ' लाच ' या सदरात मोडतो ..पत्नीने आपण दारू प्यायल्याबद्दल कटकट करू नये ..बडबड करू नये ..म्हणून तिला चूप करण्यासाठी ..दारू पितो तरी तुझ्यावर माझे प्रेम आहे हे दर्शवण्यासाठी तिला ' लाच ' म्हणून ' गजरा ' किवा मिठाई ..तिच्या आवडीच्या इतर वस्तू आपण खरेदी करून आणतो ..दारू न पिता ..पत्नीच्य आनंदासाठी शक्य होईल तेव्हा गजरा आणणे ...तिला महिन्यातून एकदा का होईना बाहेर फिरायला नेणे ..हॉटेलिंग करणे ..सिनेमाला जाणे या गोष्टी भावनिक बंध अधिक दृढ करतात .." सर लेकीन मै घर मे पत्नी के पास ऐसे खर्चे के लिये पैसे देता हु ..वो जो चाहे खर्च कर सकती है " एक जण उद्गारला .." अहो पण केवळ पत्नीला भरपूर पैसे देवून तिची भावनिक गरज पूर्ण होत नाही ..एकटे फिरायला जाणे ..खरेदीला जाणे ..हे स्त्रियांना बहुधा मनापासून आवडत नाही ..आपला पती सोबत असेल तर त्यांच्या चित्तवृत्ती अधिक बहरतात ..हे सगळे मानसिक पातळीवर समजून घ्यायला हवेय ..केवळ पत्नीजवळ भरपूर पैसे दिले की काम भागले असे मानणे हा ' व्यवहार ' झाला ..संसार नाही !

( बाकी पुढील भागात )

Monday, September 8, 2014

खरा पुरुषार्थ !

खरा पुरुषार्थ !  ( बेवड्याची डायरी - भाग ६२ वा ) 

आपण आता एकंदरीत नैसर्गिक दृष्टीने लैंगिकतेचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केलाय ..लैंगिकता हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे हे जाणून घेतानाच शरीर संबंध म्हणजे नेमके काय ..त्या मागील जवाबदारी ..लैंगिक तृप्ती म्हणजे काय ..त्याबाबतचे गैरसमज ..त्याबाबतची स्त्री -पुरुषांची मानसिकता इत्यादी गोष्टींबाबत देखील जाणून घेतले पाहिजे ..असे सांगत सरांनी फळ्यावर ..' कामतृप्ती ' हा शब्द लिहिला ..सगळ्यांच्या भुवया उंचावल्या ..मग सरांनी प्रश्न विचारला कोणी सांगू शकेल का याचा अर्थ ? आता या विषयाबाबत चांगलाच मोकळेपणा आलेला असल्याने चारपाच हात वर झाले ..' सर कामतृप्ती म्हणजे शरीर संबंधांचा शेवट असतो ..' एकाने सांगितले .." सर कामतृप्ती म्हणजे लैंगिक सुखाची चरम अवस्था " .." कामतृप्ती म्हणजे वीर्य स्खलनाची अवस्था " वेगवेगळी उत्तरे येत होती .." अगदी बरोबर तुम्ही योग्य दिशेने विचार करत आहात ..मात्र बहुतेक वेळा " कामतृप्ती " ही संज्ञा एकांगी अथवा एका बाजूने विचार करूनच लक्षात घेतली जाते ..शरीर संबंधातील लैंगिक उत्तेजनेचा आनंददायी शेवट ..वीर्य स्खलनाचा व अत्युच्च शारीरिक व मानसिक आनंद मिळवून देणारा क्षण म्हणजे ' कामतृप्ती ' असे म्हणता येईल ...येथे स्त्री - पुरुष या दोघांचा मानसिक व शारीरिक आनंदाचा विचार असला पाहिजे ...त्या साठी स्त्री पुरुषांची मने प्रसन्न असली पाहिजेत ..हवा तसा एकांत पाहिजे ..मुख्य म्हणजे आपल्या जोडीदाराच्या कामतृप्तीचा देखील विचार असला पाहिजे ..जर आपल्या जोडीदाराचे मन दुखी: असेल ..चिंताग्रस्त असेल ..निराश असेल ..तर आपल्या सोबत तो अत्युच्च आनंदाचा क्षण जोडीदार अनुभवू शकणार नाही ..व्यसनी व्यक्तीच्या बाबतीतच नव्हे तर सर्वसामान्य पुरुषांच्या बाबतीत देखील या बाबतचे शास्त्रीय ज्ञान नसल्याने ..बहुधा जोडीदाराच्या आनंदाचा विचार पुरुष करत नाहीत ..शरीर संबंध म्हणजे स्त्री च्या दृष्टीने केवळ एक वैवाहिक जवाबदारी ..अथवा नावडीचे कर्म उरते

निसर्गतः स्त्री व पुरुष यांच्या लैंगिक उत्तेजनेच्या आणि लैंगिक तृप्तीच्या बाबतीत काही फरक आहे ..या बाबत महेश मांजरेकर यांच्या ' प्राण जाये पर चाॅल ना जाये " या चित्रपटात दाखवलेले दोन प्रसंग अतिशय मार्मिक आहेत ..एका प्रसंगात ..बेकार ..नोकरी न करणारा ..रिकामटेकडा असा नवरा दाखवला आहे ..जो लग्न झाल्यावर काही काम धंदा न करता सासऱ्याच्या घरी राहत असतो .छोट्याशा चाळीत असलेल्या सासऱ्याच्या खोलीत सासू सासरा ..मेव्हणा .आणि हे दोघे नवरा बायको राहत असतात ..शरीर संबंधांसाठी हवा तसा एकांत मिळू शकत नाही ..मात्र कामपिपासू नवरा एके दिवशी रात्री आसपास सगळी मंडळी झोपलेली असताना निर्लज्ज होऊन पत्नीशी जवळीक करण्याचा प्रयत्न करतो ..पत्नी लज्जेमुळे ..त्याला नकार देते ..यावर तो आरडा ओरडा करतो ..घर डोक्यावर घेतो ..पत्नीवर वाट्टेल ते आरोप करतो ..तिच्या चारित्र्यावर चिखलफेक करतो ..शेवटी सासू सासरा जागे होतात ..ते या कामपिसाट जावयाची समजूत घालतात ..आम्ही दोघे बाहेर गॅलरीत जातो झोपायला असे म्हणून ..जावयाला एकांत उपलब्ध करून देतात ..त्यावेळी त्या पत्नीच्या चेहऱ्या वरचे ओशाळलेले ..व्यथित झालेले ..भाव अतिशय करूण आहेत.. दुसऱ्या एका प्रसंगात दारुडा पती ..दारूच्या नशेत पत्नीशी शरीर संबंध ठेवतोय ..त्याच वेळी ..ती त्याला तिच्या अडचणी ..संसारिक चिंता ..त्याच्या दारूमुळे घरात आलेली विपन्नता ..तिला बाहेर काम करताना येणाऱ्या अडचणी वगैरे बाबत सांगू इच्छित आहे ..मात्र याचे सगळे लक्ष स्वताच्या कामतृप्ती कडे आहे ..तो तिला चूप बस म्हणून रागावतो ..हे नंतर बोलू असे म्हणून आपला कार्यभाग सुरु ठेवतो ..आणि आपले काम साधल्यावर पत्नीच्या शेजारी नशेत गाढ झोपी जातो ..शेवटी कॅमेरा स्त्री च्या चेहऱ्यावर आहे ..तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळताना दाखवले आहेत ..अतिशय सुन्न करणारे हे दोन्ही प्रसंग आहेत ..अंतर्मुख व्हायला लावणारे ..मात्र खंत अशी की हे प्रसंग सुरू असताना थेटर मध्ये ..त्या पुरुषांच्या निर्लज्ज पणाला लोक दाद देवून शिट्ट्या वाजवत होते ..हसत होते विनोदी प्रसंग असल्यारखे ..त्या स्त्रियांच्या मानसिकतेचा विचार बहुधा झाला नाही ..किवा शेवटी त्या पत्नीच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू कोणाला बोचले नाहीत .

वरील प्रसंग सरांनी अशा पद्धतीने सांगितले की आम्हाला सगळ्यांना हळहळ वाटली ..काही क्षण सगळे स्तब्ध झालो ..खरेच कामतृप्ती एकांगी कल्पना नाहीय ..केवळ शारीरिक पातळीवर अनुभवण्याची प्रक्रिया नाही ...ते एक मंगल मिलन असते ..स्त्री चे समर्पण असते ..अत्युच्च आनंदाचा सोहळा असतो ..त्यामागे स्त्री च्या मानसिकतेचा विचार असलाच पाहिजे असे वाटू लागले ..केवळ शरीर संबंध ठेवण्यास पात्र असणे अथवा अपत्य प्राप्ती होणे हा पुरुषार्थ नव्हे ...संसाराच्या जवाबदारया स्वीकारणे ..आपल्या जोडीदाराला जास्तीत जास्त आनंदी ठेवणे ..कुटुंबाच्या प्रगतीचा ..विकासाचा विचार करणे.. आपल्या कर्तुत्वाने सगळ्या कुटुंबाला मान सन्मान मिळवून देणे ..या सगळ्या बाबी पुरुषार्थ या संज्ञेत मोडतात हे सरांनी सांगण्याचा प्रयत्न केला होता ..एक व्यसनी व्यसन केलेल्या अवस्थेत ..किवा त्याच्या व्यसनामुळे पत्नी चिंतीत असताना ..घरात अनेक कौटुंबिक ..आर्थिक अडचणी असताना ..शिवाय तोंडाला दारूचा गलिच्छ आंबूस वास येत असताना जेव्हा पत्नीशी शरीर संबंध ठेवतो ..तेव्हा तो त्या स्त्री वर बलात्कारच करत असतो असे वाटू लागले .

( बाकी पुढील भागात )

मालकी हक्काची भावना ..असुरक्षितता !

मालकी हक्काची भावना ..असुरक्षितता !  ( बेवड्याची डायरी - भाग ६१ वा )

लैंगिकता हा फक्त स्त्री - पुरुष यांचा शरीरसंबंध इतकाच विषय नसून ..मानवी संस्कृतीच्या मुळाशी असणारा .अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा विषय आहे हे सरांनी स्पष्ट करत या बाबतीत वेगवेगळ्या बाजूनी विचार करणे गरजेचे असल्याचे सांगितले ..आदिमानवांच्या टोळ्यात लग्न हा प्रकार अस्तित्वात नव्हता ..वयात आल्यावर शरीर संबंधांची ओढ जागृत झाली की कोणतीही स्त्री आपल्या आवडत्या पुरुषाशी शरीर संबंध ठेवू शकत असे ..त्यात देखील निसर्ग प्रेरणेनुसार ..अधिक शूर ..बलदंड ..पराक्रमी ..सुदृढ ..पराक्रमी पुरुष निवडला जात असे ..याचे कारण संबंधातून जन्माला येणारे अपत्य हे तसेच पराक्रमी ..आरोग्यपूर्ण असावे अशी स्त्री ची इच्छा असे ..इतर प्राण्यात देखील जोडीदाराच्या निवडीचा हाच निकष मादी लावत असते ..तसेच बहुतेक वेळा एकापेक्षा जास्त पुरुषांशी किवा स्त्रियांशी शरीर संबंध होत असल्याने त्यांतून जन्माला येणाऱ्या... मुलांचे संगोपन जरी निसर्गतः आई कडे असले तरी बाप कोण ही जवाबदारी निश्चित नसे ..तसेच अधिक दुबळ्या असणाऱ्या ..पराक्रमी किवा शूर नसणाऱ्या ..आरोग्यपूर्ण नसणाऱ्या ..अथवा निसर्गतः कमकुवत असणाऱ्या पुरुषांना शरीर संबंधांसाठी स्त्री मिळणे दुरापास्त होत असावे ..म्हणून लग्न संस्था अस्तित्वात आली ..ज्यात जन्माला येणाऱ्या अपत्याचे पालकत्व स्पष्ट होते ..तसेच प्रत्येक पुरुषाला शरीर संबंधासाठी कायमचा जोडीदार मिळत असे ..स्त्रीला आकर्षित करण्यासाठी ..फुला पानांच्या माळा .. हाडांचे दागिने ..भरपूर अन्न ..त्या काळी प्रचलित असणारे धन यांचा वापर सुरु झाला.. येथे हे समजून घेणे गरजेचे आहे ..इतर प्राण्यांमध्ये नर अथवा मादी यांच्यामध्ये शारीरिक सौंदर्य गौण असते ..नराच्या बाबतीत फक्त आरोग्य ..शौर्य ..पराक्रम यांचा विचार होतो ..तर मादीच्या निवडीबाबत ती केवळ एक मादी आहे..प्रजनन योग्य वयात आहे इतकाच निकष आहे ..मानवाच्या बाबतीत पुरुषांच्या दृष्टीने शारीरिक सौंदर्याच्या मापदंडानुसार सुंदर चेहरा ..नाजूक ..शारीरिक दृष्ट्या अधिक आकर्षक अशी स्त्री प्रत्येकाला मिळावी अशी इच्छा असते .. सुंदर स्त्री जोडीदार म्हणून मिळावी असे प्रत्येक पुरुषाला वाटते ..तर पराक्रमी ...शूर ..बलदंड ..देखणा असा पुरुष जोडीदार मिळावा असे प्रत्येक स्त्री ला ..मात्र प्रत्येकाच्या बाबतीत ते शक्य होत नसे..तेव्हा पासूनच स्त्री पुरुषांमध्ये एकमेकांबाबत मालकी हक्काची भावना जागृत झाली ..आपल्या जोडीदाराने दुसऱ्या स्त्री अथवा पुरुषांशी संबंध ठेवू नये या बाबत काळजी घेतली जावू लागली ..याच काळजीच्या पोटी असुरक्षितता निर्माण झाली ..

शारीरक शक्तीच्या बाबतीत बहुतेक स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत कधीक कमकुवत असल्याचा फायदा घेणे पुरुषांनी तेव्हापासूनच सुरु केले असावे ..आपल्या शारीरिक आणि बौद्धिक शक्तीच्या बळावर ..पुरुषांनी तेव्हापासूनच स्त्री ला ताब्यात ठेवण्याच्या वेगवेगळ्या युक्त्या अमलात आणायला सुरवात केली असावी ..तसेच जास्तीत जास्त स्त्रियांशी संबंध ठेवणे अथवा एकापेक्षा जास्त स्त्रियाशी लग्ने करून. त्यांचे पालनपोषण करणे हा देखील एक पुरुषी शौर्याचा मापदंड मानला जावू लागला .. याच्या उलट स्त्री ने मात्र आपल्या पतीशी प्रामाणिक रहावे..पतीला सर्वस्व..मानून एकाच पुरुषाशी एकनिष्ठ राहावे हा संकेत दृढ झाला ..कारण आपल्या हक्काच्या ..आपण लग्न केलेल्या स्त्री ने इतर पुरुषांशी संबंध ठेवणे हे पुरुषी अहंकाराला मानवण्या जोगे खचितच नाही ..अश्या स्त्रीला कुलटा ..व्यभिचारी ..पापी.. असे ठरवले जावू लागले ..योनी शुचीतेच्या कल्पना तेव्हापासूनच अस्तित्वात आल्या असाव्यात ..या उलट एकापेक्षा जास्त स्त्रियांशी संबंध ठेवणाऱ्या पुरुषाला शौर्याचे ..कर्तुत्वाचे ..प्रतिक मानले जावू लागले ..स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाण्याचा इतिहास असा जुनाच आहे ..

( बाकी पुढील भागात )

( ता. क . --हे सगळे माझे चिंतन आहे ..मी कोणी इतिहास संशोधक नाही अथवा थोर ज्ञानी नाही ..माझ्या जाणीवातून जे मला समजले आहे ते मी येथे मांडतो आहे ..त्यामुळे यात काही चुका असल्यास क्षमस्व... तज्ञांनी सुधारणा सुचवल्यास स्वागत आहे ! )

प्रेम की आकर्षण ? ? ? ?

प्रेम की आकर्षण ? ? ? ?    ( बेवड्याची डायरी - भाग ६० वा ) 

निसर्गाने मुळातच शरीर संबंधांची प्रेरणा पुनरुत्पादनाच्या हेतूने केली असल्याने ..शरीर संबंधांबद्दलचे आकर्षण तसेच स्त्री व पुरुष यांची विशिष्ट प्रकारची शरीररचना केली आहे ..या विशिष्ट शरीर रचने सोबतच स्त्री व पुरुष यांची मानसिकता देखील वेगवेगळ्या प्रकारची असते ..स्त्री कडे मातृत्व प्रदान केले असल्याने स्त्री च्या अवयवांची रचना गर्भधारणा होण्यासाठी पूरक तसेच जन्मलेल्या अर्भकाचे योग्य पोषण करण्यास गरजेचे अवयव स्त्रीला दिले गेले आहेत ..या बरोबरच अर्भकाची नीट काळजी घेण्यासाठी... स्त्री मध्ये काही भावनिक वैशिष्ट्ये निर्माण केली आहेत ..त्यात ..माया ..ममता ..सुश्रुषा ..कोमलता ..त्याग ..समर्पण .यांचा समावेश करता येईल ...मानवाच्या बाबतीत अगदी प्राथमिक अवस्थेत पोट भरण्यासाठी शिकार करणे हा एकमेव मार्ग होता ..स्त्री कडे पालनाची जवाबदारी होती तर पुरुषाकडे शिकारीची..वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी लागणारे धैर्य ..चपळाई ..प्राण्याचा जीव घेण्याची निष्ठुरता ..कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठीचे शौर्य ..धाडस हे गुण पुरुषाकडे दिले गेले ..एकप्रकारे शरीर संबंध आणि नवीन निर्माण झालेल्या पिढीचे संगोपन ..पोषण या दोन्ही दृष्टीकोनातून स्त्री व पुरुष यांची शारीरिक व मानसिक जडण घडण केली आहे ...विशिष्ट वयात येईपर्यंत स्त्री व पुरुष यांच्यातील भेद फक्त लिंग पातळीवर व मानसिक पातळीवर असतो ...मात्र वयाच्या १२ ते १८ या वयापर्यंत स्त्री व पुरुष यांच्यात संप्रेरकांच्या बदलामुळे शारीरिक बदल घडू लागतात .गुप्तांगावर केस येणे व चेहऱ्यावर मुरुमे किवा पुटकुळ्या येणे ही प्रक्रिया दोहोंच्या बाबतीत समान आहे ..मात्र आवाज बदलणे ..अधिक आक्रमक आणि साहसी होणे ..स्त्री अनुनयासाठी शोर्य दाखवणे ..वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून स्त्री ला आकर्षित करणे ..शुक्राणूंची निर्मिती.. या प्रकारचे शारीरिक व मानसिक बदल पुरुषांमध्ये तर ..स्तनांना आकार येणे ..गर्भाशयाला आधार म्हणून नितम्बांचा घेर विस्तारणे ..शरीराला विशिष्ट गोलाई प्राप्त होणे .. मसिक धर्म सुरु होणे ..लज्जा ..मोहक विभ्रम ..अधिक हळवेपण ..असे शारीरिक व मानसिक बदल स्त्री मध्ये सुरु होतात ..याच काळात आपल्या आवडीनिवडी बाबत जागृत होणे ...आवडीच्या गोष्टी करण्याचा अट्टाहास ..अधिक संवेदनशील होण्याची प्रक्रिया दोहोंच्याही बाबतीत घडत असते .

तसे पहिले तर विभिन्नलिंगी आकर्षण हे जन्मतः स्त्री पुरुषांमध्ये आढळते ..याचे उदाहरण म्हणजे मुलीला वडिलांचा जास्त लळा असणे तर मुलाला आईचा लळा अधिक असणे हे होय ..वयात आल्यावर हे विभिन्नलिंगी आकर्षण वाढत जाते ..त्यालाच बहुतेक जण प्रेम असे संबोधतात ..खरे तर प्रेम ही संकल्पना फक्त स्त्री व पुरुष यांच्यातील आकर्षणाच्या बाबतीत वापरली जाणे योग्य नाही ..प्रेमात ..त्याग ..आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी वाट्टेल ते कष्ट करण्याची तयारी ..आपल्या आवडत्या व्यक्तीच्या आनंदासाठी प्रसंगी प्राण देण्याची तयारी ..तिची सेवा करण्यात मिळणारा आनंद ..वगैरे गोष्टी असतात ..तसेच प्रेम संकल्पना केवळ स्त्री पुरुष यांच्याशी संबंधित नसून सर्व जीवसृष्टीशी तिचा संबंध असतो ..मनात ' प्रेम ' असलेली व्यक्ती कधीच कुणाची हिंसा करू शकत नाही ..कधीच कोणाचा अपमान करू शकत नाही ..कधी कुणाला दुखवू शकत नाही ..कुणावर अन्याय करू शकत नाही ..आई वडील भावंडे यांच्य्याबद्दल ..स्नेही ..नातलग ..समाज आणि संपूर्ण जीवसृष्टी बाबत आस्था ..जिव्हाळा ..अशा मोठ्या मोठ्या गोष्टी प्रेम या संकल्पनेत समाविष्ट असतात . मात्र केवळ स्त्री पुरुषामध्ये असलेल्या आकर्षणाला प्रेम समजायची हल्ली फॅशन झाली आहे ..जेमतेम १२ वर्षाची मुले मुली सिनेमा पाहून ...कथा कादंबऱ्या वाचून ..प्रेमग्रस्त होतात ..स्वप्नांच्या जगात रमतात ..आपल्या आवडत्या व्यक्तीला सुखी करण्याच्या कल्पना करतात ..त्या पोटी आपले आईवडील ..नातलग ..अशी खरी जिव्हाळ्याची माणसे सोडून द्यायला तयार होतात ही मानसिक अपरिपक्वता आहे ..जरा मनाविरुद्ध घडले की जोडीदार बदलण्यास तयार होतात ..बॉयफ्रेंड ..गर्लफ्रेंड आणि ब्रेकअप हे शब्द तर आताशा तरुण मुले मुली सर्रास वापरताना दिसतात ..मानव हा अधिक विकसित अधिक बुद्धिमान ..इतर प्राण्यांच्या तुलनेत अधिक संवेदनशील प्राणी असल्याने निसर्गाच्या बाबतीत अधिक जवाबदार असतो ..त्यामुळे प्रत्यकाने आपली जवाबदारी समजून वागले तर जगातील अर्ध्या समस्या कमी होतील .

( बाकी पुढील भागात )