Sunday, September 14, 2014

बंदिनी .. ? ? ?

बंदिनी .. ? ? ?  ( बेवड्याची डायरी - भाग ६६ वा ) 

लहानपणापासून पुरुषांच्या मनावर... तू स्पेशल आहेस असे असे संस्कार करण्यास पालक जवाबदार असतात ..घरातील मुलीच्या .. मनावर आपण अबला आहोत ..दुय्यम आहोत ..पुरुषी आधाराची आपल्याला गरज आहे ..पुरुष अधिक कर्तुत्ववान असतात ..अधिक शक्तिमान असतात ..असे कळत नकळत बिंबवले जाते ...जणू असे त्यांच्या मनावर बिंबवून त्यांना पुढे त्यांच्यावर होऊ शकणाऱ्या संभाव्य अन्यायाला सहन करण्यास त्यांनी तयार करावे असाच हेतू असतो .. अगदी खाण्यापिण्याच्या वस्तूपासून ते ...कपडेलत्ते ..खेळ..घरातील कामे ..या सर्व बाबतीत मुलींच्या वेगळेपण वाट्याला येते ..त्यांतूनच स्त्रिया अधिक अधिक सहनशील होत जातात ..काही सामाजिक प्रथा देखील हे वेगळेपण अधिक ठळक करतात ..ज्यात मुलीच्या लग्नासाठी वर संशोधन ..हुंडा ..मानपान ..सासरच्या मंडळींचा लग्नकार्यातील वरचष्मा ..जावयाचे रुसणे ..या सर्व बाबीतून त्या मुलीवर आणि तिच्या पालकांवर जणू उपकारच केले जात आहेत असे भाव असतात खरे तर घरात सकाळी सगळ्यात आधी कोण उठते आणि सगळ्यात शेवटी कोण झोपते याचा विचार केल्यास ..घरातील स्त्री सगळ्यात आधी उठते आणि रात्री सर्वात उशिरा तीच झोपते .हे उत्तर मिळेल ...म्हणजे घरात अगदी सकाळी लवकर उठून घरच्या सदस्यांसाठी चहा करण्यापासून तिची जवाबदारी सुरु होते .. रात्री सगळ्यात शेवटी ..झाकपाक करणे.. दारे खिडक्या लावणे ..दिवे बंद करणे ..सटरफटर वस्तू जागेवर ठेवणे ..अशी सर्व कामे स्त्री कडेच सोपवली जातात ..ज्या घरात स्त्री देखील पुरुषांच्या जोडीने अर्थार्जनासाठी नोकरी करते तेथे देखील अगदी थोड्याफार फरकाने हेच दिसते ..कामाचा झपाटा ..उरक ..नीटनेटकेपणा ..टापटीप ..या बाबतीतही.. स्त्री अग्रेसर असते ..घरातील पुरुषांच्या कामाच्या ..शाळा कॉलेजच्या वेळा सांभाळून त्यांना तयारीसाठी मदत करणे ..अशी शेकडो कामे स्त्रिया विनातक्रार करत असतात .त्यांना लहानपणापासूनच या साठी तयार केले जाते .. तरीही योग्य मान सन्मानाच्या बाबतीत त्यांना डावलले जाते ..त्यांच्या मताला बहुधा दुय्यम स्थान असते ..वर स्त्री च्या नशिबाला हे भोग असतातच असे सांगितले जाते ..स्त्री ला जरी ' देवी ' चे अथवा ' शक्ती ' चे स्थान दिले गेले असले तरी व्यवहारात मात्र तिची ' शक्ती ' अथवा ' दैवी ' पण क्षीण करण्यास पुरुषच जवाबदार असतो ..आपण पुरुषांनी या बाबत गंभीरपणे विचार करून स्त्री बद्दल योग्य आदर बाळगणे शिकले पाहिजे . तसेच आसपासच्या पुरुषांना विचार करण्यास भाग पाडले पाहिजे ..म्हणजे आपोआप स्त्री वर होणारे कौटुंबिक व सामाजिक अन्याय.. अत्याचार कमी होतील..

स्त्री कडे केवळ एक उपभोग्य वस्तू ..अथवा ' यंत्र ' या भावनेतून न पाहता जर एक संवेदनशील मानव म्हणून आपण पहिले तरच तिच्या त्यागाची ..कष्टाची ..समर्पणाची नीट कल्पना येवू शकते. स्त्री वरील मालकी हक्काच्या भावनेतूनच ' योनिशुचिता ' हा प्रकार जन्माला आलाय ..त्याचा संबंध थेट स्त्री च्या चारित्र्याशी आणि पुरुषाच्या इभ्रतीशी जोडला जातो ...स्त्री च्या गर्भाशयाकडे जाणाऱ्या योनीमार्गाच्या तोंडाशी एक पातळसा पडदा असतो ( हायमेन ) ज्याच्या संबंध स्त्रीच्या " शीलभंगा " शी जोडला गेलाय ..प्रथम संभोगाच्या वेळी... अथवा एखाद्या हलक्याश्या धक्क्याने ..अथवा छोट्याश्या अपघाताने देखील हा पातळ पडदा फाटू शकतो ज्यावरून ..त्या स्त्री च्या चारित्र्याची परीक्षा केली जाण्याचा प्रघात अजूनही काही ठिकाणी आढळत जाते ...खरे तर ' चारित्र्य ' ही संज्ञा केवळ योनीमार्गातील पातळ पडद्याच्या भंग होण्याशी जोडणे निव्वळ मूर्खपणा आहे ..एखाद्या स्त्री चे संसारातील समर्पण ..कुटुंबासाठी केलेला त्याग ..तिने उपसलेले कष्ट ..तिचे एकंदरीत वर्तन..कर्तुत्व ..या गोष्टीना जास्त महत्व असले पाहिजे .. संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे ' स्त्रियश्चारीत्रम ..पुरुषस्य भाग्यं .." असा ..ज्याचा अर्थ असा आहे की स्त्री चे चारित्र्य आणि पुरुषाचे भाग्य हे देव देखील समजू शकत नाहीत ..तर मानवाला कसे कळणार ? ..या श्लोकात चरित्र हा शब्द केवळ ' शील ' या अर्थाने घेतला जातो .. ..खरे तर या श्लोकाद्वारे कदाचित हेच सूचित केले गेलेय की स्त्री ला लहानपणापासून अनेक विकारी पुरुषांना तोंड द्यावे लागत असल्याने ..मामा ..काका ..वडील ..भाऊ..चुलत ..आते ..वगैरे नात्यात अथवा आसपास वावरणाऱ्या पुरुषांपासून ..स्त्री शरीराला अनेक धोके असतात ..तिच्या असहायतेचा..सहनशीलतेचा ..भाबडेपणाचा ..माफ करण्याच्या वृत्तीचा कोण कसा फायदा घेईल हे सांगणे कठीण आहे ..त्यामुळे तिच्या शिलाची नेमकी खात्री देता येणे कठीण आहे ..त्याबाबत जास्त बाऊ करू नये ..ते सगळे सहन करून .. सगळे पचवून ..केवळ मनात ठेवून स्त्री वावरत असते ..जर तिने वाच्यता केली तरी दोष तिच्याकडेच जातो ..समाज तिच्याकडेच वाईट नजरेने पहातो...म्हणून ती कोणाला काही न सांगता मनात ठेवते ..आणि तिचे चरित्र कोणाला समजू शकत नाही ..वेगळ्या दृष्टीकोनातून पहिले तर हा श्लोक उलटा असला पाहिजे.. पुरुषस्य चरित्रं .. " असा . कारण पुरुष लैंगिकतेच्या बाबतीत अधिक आक्रमक ..किवा शारीरिक संबंधाना अधिक प्राधान्य देणारा असतो .

( बाकी पुढील भागात )

No comments:

Post a Comment