पूर्व प्रणय ...? ? ? ( बेवड्याची डायरी - भाग ६३ वा )
' कामतृप्ती ' ही संकल्पना सर सांगत असताना ..आम्ही सगळे गंभीर झालो होतो ..आपल्या जोडीदाराच्या भावनांची पर्वा न करता केलेला शरीर संबंध हा ' बलात्कारच ' ठरतो हे सरांनी सांगितल्यावर ..मला अनेक प्रसंग आठवले जेथे ..दारू पिवून मी पत्नीशी प्रणय केला होता ..अगदी ' हनिमून ' च्या दिवशी देखील ..मित्रांच्या आग्रहावरून मी गुपचूप बियर प्यायलो होतो .. जवळ जाताच पत्नीने " कसलातरी आंबूस वास येतोय " हे मला बोलून दाखवले होते ..मी तिला तुझे काहीतरीच असते असे म्हणून उडवून लावले होते .. नंतर सराईत पिणारा झाल्यावर तर प्यायल्याशिवाय आपल्याला शरीरसंबंध करताच येणार नाही.. अशी भावना मनात पक्की रुजली होती ..त्यामुळे पत्नीच्या नाक मुरडण्या कडे निर्लज्ज पणे दुर्लक्ष करून मी स्वताचा स्वार्थ साधत गेलो...तिने विरोध केल्यावर देखील मी अनेकदा माझा नवरेपणाचा हक्क बजावला होता ..इतकेच नव्हे तर .." हल्ली तुझी हवी तशी साथ मिळत नाही " असा टोमणाही मारला होता ..आता सगळे आठवून प्रचंड शरम वाटत होती स्वता:ची ..वाटले जर पत्नीने नवऱ्याविरुद्ध बलात्काराची केस टाकायची ठरवले तर ??? ..पुरुषांच्या सुदैवाने स्त्रिया असे करत नाहीत ..संसारातले त्यांचे समर्पण त्यांना बांधून ठेवते ..शिवाय ' पती परमेश्वर ' हा संस्कार त्यांच्या मनावर लहानपणापासून बिंबवला गेल्याने ...त्या वारंवार माफ करतात पतीला..एक व्यक्ती म्हणून देखील मी अनेकदा पत्नीचा अपमान केला होता ..तिच्या कार्यक्षमतेवरून ..तिच्या नातलगांवरून ...टोमणे मारले होते...बावळट..मूर्ख ..बेअक्कल ..ही विशेषणे तरी नेहमीची होती .. बिचारीकडे एकमात्र शस्त्र उरले होते...रडण्याचे ..अबोला धरण्याचे .. एखादा दिवस स्वैपाक न करण्याचे ..जास्तीत जास्त काय तर रागावून एकदोन दिवस माहेरी जाण्याचे ...आता या पुढे पत्नीच्या भावनांची काळजी घ्यायची असे मी मनात ठरवले ..
सर पुढे सांगू लागले ..प्रत्यक्ष प्रणय करण्यापूर्वी आपल्या जोडीदाराशी पेमळ संवाद करणे ..गोड बोलणे..त्याची स्तुती करणे ..त्याच्या चिंता ..काळज्या जाणून घेणे ..विशिष्ट ठिकाणी स्पर्श करून जोडीदाराला उत्तेजित करणे .. या सगळ्या गोष्टी ' पूर्व प्रणय ' ( फोरप्ले ) या सदरात मोडतात ..तर स्खलन झाल्यावर ..जोडीदाराचे .थोपटून ..कुरवाळून ..आभार व्यक्त करणे ..आपण एकमेकांचे सुख दुखा:चे साथीदार आहोत याची जाणीव करून देणे..त्याच्या विवंचना समजून घेणे ..काही काळ मृदू संवाद करणे हे सगळे ( आफ्टर प्ले ) या प्रकारात येते .. ज्यामुळे भावनिक बंध दृढ राहण्यास मदत होते ..बहुतेक पुरुष पूर्वप्रणया बाबत जागरूक असतात ..परंतु पश्चात प्रणयाबाबत बेफिकीर असतात ..आपला कार्यभाग उरकला की ते जोडीदाराकडे पाठ फिरवतात ..जरी स्त्रिया बोलून दाखवत नसल्या तरी ' कामापुरते गोड बोलून आपला वापर केला गेलाय " ही भावना त्यांच्या मनात येवू शकते ..मोठ्या शहरातून जागेच्या कमतरतेमुळे ..पुरेसा एकांत नसल्याने हे सर्व साग्रसंगीत शक्य होत नाही ..बहुतेक वेळा शरीरसंबंध ही एक तडजोड बनते ..तरीही शक्य होईल तेव्हा या गोष्टींचे भान ठेवणे गरजेचे असते ..
" किती लोक महिन्यातून एकदा का होईना आपल्या पत्नीसाठी आठवणीने गजरा आणतात ? " सरांनी अचानक सर्वाना प्रश्न विचारला..आम्ही सगळे एकमेकांकडे पाहत होतो ..फक्त एक दोन हात वर झाले ..हात वर केलेल्या एकाला सरांनी विचारले " गजरा आणला तेव्हा दारू पिवून होता का तुम्ही ? " त्याने होकारार्थी मान हलवली ..सगळे मोठ्याने हसले ..सर स्मित करून म्हणाले ..म्हणजे तुम्ही आणलेला गजरा ' लाच ' या सदरात मोडतो ..पत्नीने आपण दारू प्यायल्याबद्दल कटकट करू नये ..बडबड करू नये ..म्हणून तिला चूप करण्यासाठी ..दारू पितो तरी तुझ्यावर माझे प्रेम आहे हे दर्शवण्यासाठी तिला ' लाच ' म्हणून ' गजरा ' किवा मिठाई ..तिच्या आवडीच्या इतर वस्तू आपण खरेदी करून आणतो ..दारू न पिता ..पत्नीच्य आनंदासाठी शक्य होईल तेव्हा गजरा आणणे ...तिला महिन्यातून एकदा का होईना बाहेर फिरायला नेणे ..हॉटेलिंग करणे ..सिनेमाला जाणे या गोष्टी भावनिक बंध अधिक दृढ करतात .." सर लेकीन मै घर मे पत्नी के पास ऐसे खर्चे के लिये पैसे देता हु ..वो जो चाहे खर्च कर सकती है " एक जण उद्गारला .." अहो पण केवळ पत्नीला भरपूर पैसे देवून तिची भावनिक गरज पूर्ण होत नाही ..एकटे फिरायला जाणे ..खरेदीला जाणे ..हे स्त्रियांना बहुधा मनापासून आवडत नाही ..आपला पती सोबत असेल तर त्यांच्या चित्तवृत्ती अधिक बहरतात ..हे सगळे मानसिक पातळीवर समजून घ्यायला हवेय ..केवळ पत्नीजवळ भरपूर पैसे दिले की काम भागले असे मानणे हा ' व्यवहार ' झाला ..संसार नाही !
( बाकी पुढील भागात )

No comments:
Post a Comment