Monday, September 8, 2014

मालकी हक्काची भावना ..असुरक्षितता !

मालकी हक्काची भावना ..असुरक्षितता !  ( बेवड्याची डायरी - भाग ६१ वा )

लैंगिकता हा फक्त स्त्री - पुरुष यांचा शरीरसंबंध इतकाच विषय नसून ..मानवी संस्कृतीच्या मुळाशी असणारा .अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा विषय आहे हे सरांनी स्पष्ट करत या बाबतीत वेगवेगळ्या बाजूनी विचार करणे गरजेचे असल्याचे सांगितले ..आदिमानवांच्या टोळ्यात लग्न हा प्रकार अस्तित्वात नव्हता ..वयात आल्यावर शरीर संबंधांची ओढ जागृत झाली की कोणतीही स्त्री आपल्या आवडत्या पुरुषाशी शरीर संबंध ठेवू शकत असे ..त्यात देखील निसर्ग प्रेरणेनुसार ..अधिक शूर ..बलदंड ..पराक्रमी ..सुदृढ ..पराक्रमी पुरुष निवडला जात असे ..याचे कारण संबंधातून जन्माला येणारे अपत्य हे तसेच पराक्रमी ..आरोग्यपूर्ण असावे अशी स्त्री ची इच्छा असे ..इतर प्राण्यात देखील जोडीदाराच्या निवडीचा हाच निकष मादी लावत असते ..तसेच बहुतेक वेळा एकापेक्षा जास्त पुरुषांशी किवा स्त्रियांशी शरीर संबंध होत असल्याने त्यांतून जन्माला येणाऱ्या... मुलांचे संगोपन जरी निसर्गतः आई कडे असले तरी बाप कोण ही जवाबदारी निश्चित नसे ..तसेच अधिक दुबळ्या असणाऱ्या ..पराक्रमी किवा शूर नसणाऱ्या ..आरोग्यपूर्ण नसणाऱ्या ..अथवा निसर्गतः कमकुवत असणाऱ्या पुरुषांना शरीर संबंधांसाठी स्त्री मिळणे दुरापास्त होत असावे ..म्हणून लग्न संस्था अस्तित्वात आली ..ज्यात जन्माला येणाऱ्या अपत्याचे पालकत्व स्पष्ट होते ..तसेच प्रत्येक पुरुषाला शरीर संबंधासाठी कायमचा जोडीदार मिळत असे ..स्त्रीला आकर्षित करण्यासाठी ..फुला पानांच्या माळा .. हाडांचे दागिने ..भरपूर अन्न ..त्या काळी प्रचलित असणारे धन यांचा वापर सुरु झाला.. येथे हे समजून घेणे गरजेचे आहे ..इतर प्राण्यांमध्ये नर अथवा मादी यांच्यामध्ये शारीरिक सौंदर्य गौण असते ..नराच्या बाबतीत फक्त आरोग्य ..शौर्य ..पराक्रम यांचा विचार होतो ..तर मादीच्या निवडीबाबत ती केवळ एक मादी आहे..प्रजनन योग्य वयात आहे इतकाच निकष आहे ..मानवाच्या बाबतीत पुरुषांच्या दृष्टीने शारीरिक सौंदर्याच्या मापदंडानुसार सुंदर चेहरा ..नाजूक ..शारीरिक दृष्ट्या अधिक आकर्षक अशी स्त्री प्रत्येकाला मिळावी अशी इच्छा असते .. सुंदर स्त्री जोडीदार म्हणून मिळावी असे प्रत्येक पुरुषाला वाटते ..तर पराक्रमी ...शूर ..बलदंड ..देखणा असा पुरुष जोडीदार मिळावा असे प्रत्येक स्त्री ला ..मात्र प्रत्येकाच्या बाबतीत ते शक्य होत नसे..तेव्हा पासूनच स्त्री पुरुषांमध्ये एकमेकांबाबत मालकी हक्काची भावना जागृत झाली ..आपल्या जोडीदाराने दुसऱ्या स्त्री अथवा पुरुषांशी संबंध ठेवू नये या बाबत काळजी घेतली जावू लागली ..याच काळजीच्या पोटी असुरक्षितता निर्माण झाली ..

शारीरक शक्तीच्या बाबतीत बहुतेक स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत कधीक कमकुवत असल्याचा फायदा घेणे पुरुषांनी तेव्हापासूनच सुरु केले असावे ..आपल्या शारीरिक आणि बौद्धिक शक्तीच्या बळावर ..पुरुषांनी तेव्हापासूनच स्त्री ला ताब्यात ठेवण्याच्या वेगवेगळ्या युक्त्या अमलात आणायला सुरवात केली असावी ..तसेच जास्तीत जास्त स्त्रियांशी संबंध ठेवणे अथवा एकापेक्षा जास्त स्त्रियाशी लग्ने करून. त्यांचे पालनपोषण करणे हा देखील एक पुरुषी शौर्याचा मापदंड मानला जावू लागला .. याच्या उलट स्त्री ने मात्र आपल्या पतीशी प्रामाणिक रहावे..पतीला सर्वस्व..मानून एकाच पुरुषाशी एकनिष्ठ राहावे हा संकेत दृढ झाला ..कारण आपल्या हक्काच्या ..आपण लग्न केलेल्या स्त्री ने इतर पुरुषांशी संबंध ठेवणे हे पुरुषी अहंकाराला मानवण्या जोगे खचितच नाही ..अश्या स्त्रीला कुलटा ..व्यभिचारी ..पापी.. असे ठरवले जावू लागले ..योनी शुचीतेच्या कल्पना तेव्हापासूनच अस्तित्वात आल्या असाव्यात ..या उलट एकापेक्षा जास्त स्त्रियांशी संबंध ठेवणाऱ्या पुरुषाला शौर्याचे ..कर्तुत्वाचे ..प्रतिक मानले जावू लागले ..स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाण्याचा इतिहास असा जुनाच आहे ..

( बाकी पुढील भागात )

( ता. क . --हे सगळे माझे चिंतन आहे ..मी कोणी इतिहास संशोधक नाही अथवा थोर ज्ञानी नाही ..माझ्या जाणीवातून जे मला समजले आहे ते मी येथे मांडतो आहे ..त्यामुळे यात काही चुका असल्यास क्षमस्व... तज्ञांनी सुधारणा सुचवल्यास स्वागत आहे ! )

No comments:

Post a Comment